Search This Blog

Friday, April 2, 2010

"माझे आयुष्यं".

आयुष्यं म्हणजे असतो एक प्रवास
जो सुरु होतो,
आपल्या जन्मापासुन
न कदाचित
मरणानंतरही संपत नाही.

अनेक उन्हाळे-पावसाळे
पहायला मिळतात या प्रवासात.
काही सुखाचे क्षण
अनुभवायला मिळतात,
तर काही कायमचा
धडा शिकवुन जातात

काही स्वप्ने नकळतपणे पाहिली जातात
तर काही जाणुन बुजुन
पण अनेकदा त्यातली काही स्वप्ने
अर्धवटच राहुन जातात

अशा ह्या प्रवासाच्या पुस्तकात
काही पाने नकळत जोडली जातात
तर काही कोरीच राहुन जातात....
आणि मग शेवटी ह्या कोऱ्या
कागदांचे तयार होते एक वेगळेच पुस्तक
ज्याला आपण नाव देतो "माझे आयुष्यं".

आयुष्य


आयुष्य नक्की काय असतं?

हसऱ्या फुलावरचं दव असतं..

नाचऱ्या मुलाचा नाच असतं..

दुखऱ्या हृदयाचा घाव असतं..


आयुष्य नक्की काय असतं,

समुद्रात चाललेलं दिशाहीन जहाज असतं,

किनारा शोधत फ़िरायचं असतं,

वादळांनी डगमगून जायचं नसतं.


आयुष्य नक्की काय असतं?

ते एक तलम रेशमी वस्त्र असतं..

ज्याचं त्यानेच ते विणायचं असतं

पण अती ताणायचं नसतं..


आयुष्य नक्की काय असतं?

सतत गुंतत जाणारं ते एक कोडं असतं

ते ज्याचं त्यानेच सोडवायचं असतं

गुंतून मात्र त्यात पडायचं न

अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

गंध आवडला फुलाचा म्हणून
फूल मागायचं नसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

परक्यांपेक्षा आपलीच माणसं
आपल्याला नेहमी दगा देतात
एकमेकांच्या पाठीवर मग्
नजरे आडून वार होतात

भळभळणा-या जखमेतून
विश्वास घाताचं रक्त वाहतं
छिन्नविछीन्न जखमेला तेव्हा
आपणच पुसायचं असतं

अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

आपलं सुःख पाहण्याचा तसा
प्रत्येकाला अधिकार आहे..
पण्; दुस-याला मारुन जगणं
हा कुठला न्याय आहे...

माणूस म्हणुन माणसावर
खरं प्रेम करायचं
आपल्या साठी थोडं,
थोडं दुस-यासाठी जगायचं

जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बाणवायचं आसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

आपल्याला कोणी आवडणं
हे प्रत्येक वेळी च प्रेम नसतं
आकर्षणाचं स्वप्नं ते
आकर्षणंच असतं...

मान्य आहे,
आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं...
पण् जे चकाकतं
ते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं

मन् आपलं वेडं असतं
वेडं आपण व्हायचं नसतं..
मन मारुन जगण्यापेक्षा
वेळीच त्याला आवरायचं

अशावेळी....
आणि अशाच वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

साहस


मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी ,

मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी ,
मैत्रीच्या खुणा आठवणीत बांधणारी ..
मनांच्या भिंतींना मैत्रीचे दार पाडून ,
एक प्रेमळ मित्रासाठी आर्त हाक देणारी ...

कधी शिकवण कधी आठवण ,
तहानलेल्या चातकाला जशी पावसाची वणवण ...
तरीही या जीवनात सुखाचा आसमंत फुलवणारी ,
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी .........

माझ्या या आयुष्यात तुझ्या मैत्रीचा सहारा ,
मैत्रीच्या नात्याला तुझ्या आठवणींचा दुजोरा ..
दुःखाच्या चिंब पावसात शोधतोय ,
सुखाची उब देणारा तुझ्या मैत्रीचा निवारा ...

पाणावलेल्या डोळ्यांनी आज पुन्हा त्याकडे बघतोय ,
तुझ्या आठवणीचा एक रंग त्यात शोधतोय ..
जीवनाच्या वळणांवर वेगळेचं रंग रंगवणारी .....
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी